स्टार्ट-अप इंडिया केरळ यात्रा

केरळ स्टार्ट-अप मिशनविषयी

केरळ स्टार्ट-अप मिशन (केसम) राज्यातील उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी केरळ सरकारची नोडल एजन्सी आहे आणि केरळ तंत्रज्ञान स्टार्ट-अप धोरणासाठी अंमलबजावणी संस्था आहे जी पायाभूत सुविधा, इनक्यूबेटर्स आणि अॅक्सीलरेटर्स, मानव भांडवल विकास, निधीपुरवठा, राज्य सरकारचे सहाय्य, प्रशासन, सार्वजनिक खासगी भागीदारी, स्केलिंग, नवीन इनक्यूबेटर्स स्थापित करणे आणि कल्पनांपासून आयपीओ पर्यंत वेगाने प्रवास करण्यासाठी स्टार्ट-अप-बूट-अप-स्केल-अप मॉडेलचा स्वीकार करणे यासारख्या वेगवेगळ्या घटकांद्वारे स्टार्ट-अप पर्यावरणाला चालना देते. देशाच्या इतर स्टार्ट-अप इकोसिस्टीम्स व्यतिरिक्त केरळमध्ये शिक्षणसंस्था, उद्योग, संशोधन व विकास संस्था आणि स्टार्ट-अप्सना जोडण्याचे विलक्षण मॉडेल अस्तित्वात आहे.

स्टार्ट-अप यात्रा - केरळचा शुभारंभ यांच्या शुभहस्तेः मा. मुख्यमंत्री. पिनारायी विजयन 1 नोव्हेंबर रोजी आणि 27 नोव्हेंबर, 2018 पर्यंत चालू राहील. यात्रेचा भाग म्हणून, केरळच्या 14 वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये 8 बूटकॅम्प आणि 14 व्हॅन स्टॉपची योजना आहे. सर्व बूटकॅम्पमध्ये विद्यार्थ्यांना उद्योजकतेची माहिती प्रदान करण्यास कल्पनाशक्ती कार्यशाळा आणि कल्पनेचे वर्णन सत्राचे आयोजन केले जाईल. महत्त्वाकांक्षी/उदयोन्मुख उद्योजक त्यांचे विचार पॅनेलसमोर मांडू शकतात आणि सर्वोत्तम कल्पना असलेल्या लोकांना सर्वोत्कृष्ट इनक्यूबेटरसह 2-दिवस अॅसिलरेशन प्रोग्राममध्ये सहभागी होण्याची सुवर्णसंधी मिळेल. अखेरीस, ज्या लोकांच्या कल्पनांची निवड झाली त्यांना इनक्यूबेटर्सद्वारे ऑफर्स मिळण्यास व राज्य सरकारद्वारे लाभ मिळण्यास सादरीकरण करण्याची संधी मिळेल.

 

बूटकॅम्पची सत्र संरचना

09:30 - 11:00 विद्यार्थ्यांची नोंदणी 
09:30 - 11:00 प्रशिक्षकाचे प्रशिक्षण कार्यशाळा (अध्यापक सदस्यांसाठी)
11:00 - 11:15 राज्यातील यशस्वी उद्योजकांसोबत प्रेरणादायी चर्चा
11:15 - 11:30 मार्गदर्शकाचे व्याख्यान: स्टार्ट-अपसाठी काय करावे व काय करू नये
11:30 - 12:30 कल्पना कार्यशाळा
12:30 - 13:30 दुपारचे जेवण 
13:30 - 16:30 कल्पना सादरीकरण सत्र 1 
13:30 - 16:30 कल्पना सादरीकरण सत्र 2 
16:30 - 17:00 महाविजेत्यांसाठी निवड 

 

स्टार्ट-अप इंडिया यात्रा - व्हॅन

बूटकॅम्पच्या व्यतिरिक्त, स्टार्ट-अप इंडिया यात्रा व्हॅन खालील उद्देशांसह केरळच्या विविध शहरांमध्ये प्रवास करेल:

1. स्टार्ट-अप इंडिया आणि केरळ स्टार्ट-अप पॉलिसीबद्दल जागरुकता पसरविणे

2. एखादी कल्पना मांडण्याच्या संधीसाठी आणि ॲक्सीलरेशन प्रोग्रामकरिता निवड होण्यासाठी

प्रत्येक गंतव्यस्थानासाठी अनेक कॉलेजांची ओळख करण्याती आली आहे. व्हॅन 90-मिनिटांच्या थांब्यासह एक दिवसीय बूटकॅम्पसाठी खालील महाविद्यालयांमध्ये थांबेल:

स्टार्ट-अप इंडिया केरळ यात्रा वेळापत्रक