स्टार्ट-अप इंडियाविषयी

स्टार्ट-अप इंडिया हा भारत सरकारचा प्रमुख उपक्रम आहे, ज्याचा हेतू स्टार्ट-अप संस्कृतीचा उत्प्रेरक बनणे आणि भारतामधील नावीन्य व उद्योजकता यांसाठी एक कणखर आणि समावेशक इकोसिस्टीम बनविणे हा होय.

नोंदणी करा

स्टार्ट-अप इंडिया उपक्रम नक्की आहे तरी काय?

स्टार्ट-अप इंडिया उपक्रमाची सुरुवात 16th जानेवारी, 2016 रोजी करण्यात आली, यामध्ये विविध कार्यक्रमांची आखणी केलेली आहे. उद्योजकांना सहाय्य करण्यासोबत एक मजबूत स्टार्ट-अप इकोसिस्टीम उभारणे आणि नोकरी शोधणारा देश ही प्रतिमा पुसून नोकरी निर्माण करणारा देश अशी भारताची प्रतिमा निर्माण करण्याचा स्टार्ट-अप इंडिया उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. हे कार्यक्रम एका समर्पित स्टार्ट-अप इंडिया टीमद्वारे व्यवस्थापित केले जातात, जे उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाला (डीपीआयआयटी) अहवाल देते

 

स्टार्ट-अप इंडियाच्या कार्यक्रमांची विस्तृत रुपरेखा खालील कृती योजनेमध्ये सांगण्यात आली आहे.

 

स्टार्ट-अप करिता सहाय्यासाठीचे प्रमुख मुद्दे

स्टार्ट-अप इंडिया उपक्रमांतर्गत

0

सरलीकृत आणि हाताळणी

सुलभ अनुपालन, नियामक आणि पेटंट सहाय्य, बाजारपेठ प्रवेश आणि निधीपुरवठा सहाय्य आणि यशस्वी होण्यासाठी स्टार्ट-अप्ससाठी वेब पोर्टल.

0

निधीपुरवठा आणि प्रोत्साहन

पात्र स्टार्ट-अप्ससाठी इन्कम टॅक्स आणि कॅपिटल गेन्स टॅक्सवर सूट; सीड फंड, फंड ऑफ फंड, इन्व्हेस्टर कनेक्ट पोर्टल आणि स्टार्ट-अप इकोसिस्टीममध्ये अधिक भांडवल समाविष्ट करण्यासाठी क्रेडिट गॅरंटी योजना.

0

इनक्यूबेशन आणि उद्योग-शैक्षणिक भागीदारी

इनक्यूबेटर आणि नाविन्यपूर्ण प्रयोगशाळा, एमएआरजी मार्गदर्शन संपर्क, कार्यक्रम, स्पर्धा आणि तुमच्या स्टार्ट-अपला वाढविण्यास मदत करण्यासाठी अनुदान.