वापरायच्या अटी
सामान्य जनतेला माहिती देण्यासाठी स्टार्ट-अप इंडिया हब ऑनलाईन पोर्टल तयार करण्यात आले आहे. या वेबसाईटवर प्रदर्शित केलेली कागदपत्रे आणि माहिती केवळ संदर्भाच्या हेतूसाठी आहे आणि कायदेशीर कागदपत्रांचा विचार करत नाही.
औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभाग (डीपीआयआयटी), वाणिज्य मंत्रालय, भारत सरकार किंवा इन्व्हेस्ट इंडिया स्टार्ट-अप इंडिया हब ऑनलाईन पोर्टलमध्ये असलेल्या माहिती, मजकूर, ग्राफिक्स, लिंक किंवा इतर वस्तूंची अचूकता किंवा पूर्णतेची हमी देत नाही. अपडेट आणि दुरुस्त्या यांचा विचार केला तर वेब कंटेंट हे नियमितपणे बदलत राहते.
या वेबसाईटवर पोस्ट केलेल्या माहितीत गैर-सरकारी/खासगी संस्थांद्वारे बनवलेल्या आणि देखभालीत असलेल्या हायपरटेक्स्ट लिंक किंवा पॉईंटरचा समावेश असू शकेल. डीपीआयआयटी तुमच्या माहिती आणि सोयीसाठी ही लिंक आणि पॉईंटर प्रदान करीत आहे. जेव्हा तुम्ही वेबसाईट बाहेरील लिंक निवडता तेव्हा तुम्ही ‘भारत सरकार वेबसाईटसाठी असलेल्या नियमावली’च्या बाहेर जात असता आणि बाहेरील वेबसाईटचे मालक/प्रायोजक यांच्या गोपनीयता आणि सुरक्षा धोरणांशी निगडीत असता.
या अटी व शर्ती भारतीय कायद्यानुसार असतील आणि शासित केल्या जातील. या अटी व शर्ती अंतर्गत उद्भवणारे कोणतेही विवाद हे भारतीय न्यायधिकारक्षेत्राच्या अधीन असतील.