स्टार्ट-अप इकोसिस्टिम
एखाद्या स्थानातील (भौतिक आणि/किंवा वास्तविक) उद्योजक, विविध टप्प्यांमधील त्यांचे स्टार्ट-अप्स आणि विविध समर्थक, निधी, संशोधन आणि माहिती केंद्र स्टार्ट-अप इकोसिस्टीम बनवितात.
स्टार्ट-अप:
|
स्टार्ट-अप: स्टार्ट-अप तसे बघता नवीन उद्योजकीय उपक्रम किंवा कंपनी आहे ज्याचे ध्येय अभिनव उत्पादन, प्रक्रिया किंवा सेवेचा विकास करून बाजारातील मागणी पूर्ण करणे आहे. |
आधार संस्था:
|
इनक्यूबेटर्स: इनक्यूबेटर ही तंत्रज्ञान/व्यवस्थापन शाळेतील एक संस्था आहे किंवा स्वतंत्र सेटअप आहे जी प्रारंभिक टप्प्यातील स्टार्ट-अप्सना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यास आणि कामाची जागा, व्यवस्थापन प्रशिक्षण, कॅप्टिव्ह मेंटर पूल, तंत्रज्ञान सेवांचा ॲक्सेस इ. सारख्या सेवा प्रदान करून वाढविण्यास मदत करते. |
|
ॲक्सिलरेटर्स: ॲक्सिलरेटर ही एक संस्था आहे, एकतर स्वतंत्र संस्था किंवा कॉर्पोरेट प्रोग्राम आहे जी तीव्र निमग्न शिक्षण, मार्गदर्शन आणि फायनान्सिंगद्वारे प्रारंभिक टप्प्यातील कंपन्यांना सहाय्य करते. स्टार्ट-अप्स निश्चित कालावधीसाठी प्रवेगक प्रविष्ट करतात आणि पुढे अशा भक्कम कंपन्या म्हणून प्रस्थापित होतात ज्या वृद्धीसाठी सज्ज असतात.. त्याचा उद्देश अल्प कालावधीत पोर्टफोलिओ बॅच स्टार्ट-अप्सच्या वृद्धीस चालना देण्याचा असतो. |
मेंटर: मेंटर (विशेषत्वाने एकाच व्यवसायात असलेल्या अनुभवी व्यक्ती) कमी अनुभव असलेल्या स्टार्ट-अप्सना उत्कृष्ट प्रचलने, व्यवस्थापन साधने, उद्योगातील संबंध इ.विषयी मार्गदर्शन करतात. |
निधी संस्था:
|
एंजल गुंतवणूकदार: हे सीड किंवा अर्ली स्टेज गुंतवणूकदार जेथे जोखीम अत्यंत जास्त असते तेथे अतिशय लहान प्रमाणात रक्कम गुंतवितात. ते सहसा धनाढ्य किंवा अत्याधिक संपत्ती असणार्या व्यक्ती असतात. |
|
व्हेंचर कॅपिटलिस्ट/प्रायव्हेट इक्विटी: या कंपन्या खास करून वाढीमध्ये आणि कंपनीच्या जीवनचक्राच्या उशिरा टप्प्यांमध्ये गुंतवितात. ते फर्म्स/ व्यावसायिक गुंतवणूकदार असल्यामुळे, ते कायदेशीर, लेखासंबंधी आणि नेटवर्किंग सहाय्याची देखील आपूर्ती करतात. |
ज्ञान:
|
संसाधने आणि साधने: संशोधन संस्था आणि विद्यापीठे यासारख्या संस्था स्टार्ट-अप्सना व्यवसायाच्या शब्दावलीशी परिचित होण्यास, उद्योगातील अंतर्दृष्टी मिळवण्यास मदत करतात, व्यवसाय योजना विकसित करण्यास शिकतात आणि गुंतवणूकदारांशी संपर्क साधतात, त्यांचे कायदेशीर आणि आर्थिक ज्ञान मजबूत करतात. |