बौद्धिक संपत्ती अधिकार (आयपीआर) कल्पकतेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. हे माहितीवर आधारित असलेल्या कोणत्याही अर्थव्यवस्थेचा पाया आहे. हे निर्मिती आणि हक्कांचा इंटरफेस आहे. हे अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रांना व्यापते आणि उद्योगांच्या स्पर्धात्मकतेच्या खात्रीसाठी याच्या महत्त्वात वाढ होत चालली आहे. आयपीआरची भूमिका अन्वेषकासाठी त्याच्या/तिच्या निर्मितीचे संरक्षण करण्यासाठी एक कायदेशीर हक्क पुरविणे आणि तसेच, त्या निर्मितीपासून बेकायदेशीर पद्धतीने त्याचा फायदा घेण्यापासून इतरांना रोखणे आणि अशा प्रकारे त्या चक्राचा पुनः आविष्कार टाळणे ही असते.
नाविन्यपूर्ण गोष्टींचे रक्षण करण्यासाठी वापरली जाणारी आयपीआरची विविध साधने आहेत:-
- कॉपीराईट: संगीत, साहित्यिक, कलात्मक, व्याख्याने, क्रीडा, कला पुनर्निर्मिती, नमुने, छायाचित्रे, संगणक सॉफ्टवेअर अशा सृजनशील कार्यांच्या संरक्षणाशी संबंधित आहे.
- पेटंट: वास्तववादी कल्पकतांशी संबंधित आणि अभिनव, अस्वाभाविक आणि उपयुक्त असलेल्या संशोधनांचे संरक्षण करणे हा हेतू असतो.
- ट्रेडमार्क: व्यापारी चिन्हांशी संबंधित आहे आणि तसेच, व्यक्तिगत नावे, पत्रे, अंक, अलंकारिक घटक (लोगो); उपकरणे; नजरेत दिसून येणारे दोन किंवा तीन मितीय चिन्हे/आकार किंवा त्यांचे संयोग; ऐकता येण्याजोगी चिन्हे (ध्वनीच्या खुणा) उदा. एखाद्या पशूचे ओरडणे किंवा एखाद्या बाळाच्या हसण्याचा आवाज; घ्राणेंद्रियाच्या खुणा (गंधाच्या खुणा), ठराविक सुगंधांचा वापर यांच्यासह शब्द/चिन्हे यांच्यासारख्या वैशिष्ट्यपूर्ण खुणांच्या संरक्षणाशी संबंधित.
- औद्योगिक रचना: आकार, विन्यास, रचना, सजावट किंवा रेषा किंवा रंगांची रचना, जी कोणत्याही द्विमितीय किंवा त्रिमितीय किंवा दोन्ही प्रारुपात असतात आणि जे औद्योगिक प्रक्रियेद्वारा किंवा पद्धतीद्वारा, हातांनी, यंत्राने किंवा रसायनांनी बनविलेली, वेगवेगळी किंवा एकत्रित, नजरेद्वारा निश्चित केलेली तयार वस्तू असते.
- भौगोलिक संकेत (GI): औद्योगिक संपत्तीचे ते पैलू जे त्या उत्पादनाचा देश किंवा मूळ ठिकाण दर्शवते असे परिभाषित केले आहे. विशेषत्वाने, असे नाव त्या उत्पादनाच्या गुणवत्तेची आणि विभिन्न्तेची खात्री देते, जी मूलतः त्याच्या भौगोलिक स्थानाच्या, प्रदेशाच्या किंवा देशातील त्याच्या उगमाच्या वास्तविकतेस दर्शविते.
बौद्धिक संपत्ती अधिकार नेहमी प्रांतीय असतात. जागतिकीकरण आणि तंत्रज्ञानाचा वेगाने होणारा प्रसार यांनी बौद्धिक संपत्ती अधिकाराचे महत्त्व वाढविले आहे.