कृती योजना आणि स्टेटस रिपोर्ट

स्टार्ट-अप इंडिया हा भारत सरकारचा एक प्रमुख उपक्रम आहे, ज्यायोगे शाश्वत आर्थिक वाढ आणि मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी देशात नवकल्पना वृद्धीसाठी आणि स्टार्ट-अपसाठी एक मजबूत इको सिस्टीम उभारणे अभिप्रेत आहे. या उपक्रमामार्फत भारत सरकार नावीन्य आणि संरचनेमार्फत वृद्धीसाठी सशक्त स्टार्ट-अपसाठी प्रयत्नशील आहे.

 

उपक्रमाच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी भारत सरकारने 16 जानेवारी 2016 कृती योजनेची घोषणा केली आहे ज्यात स्टार्ट-अप इकोसिस्टीमचे सर्व पैलू संबोधित केले आहेत. या कृती योजनेसह, सरकारला स्टार्ट-अप चळवळीचा प्रसार वाढविण्याची आशा आहे. कृती योजना पुढील तीन मुद्द्यांवर आधारित आहे:

 

  • सरलीकृत आणि हाताळणी
  • निधी सहाय्यता आणि प्रोत्साहन
  • इंडस्ट्री-अकादमिया पार्टनरशिप आणि इनक्यूबेशन