अल्बर्ट आईनस्टाईन हे खरे होते ज्यावेळी त्यांनी विधान केले-
"" गर्दीचे अनुसरण करणाऱ्या महिला या सहसा गर्दीपेक्षा पुढे जाऊ शकत नाही". जी महिला एकटीच मार्गक्रमण करते ती असा ठिकाणी पोहचते जिथे याआधी सहसा कोणीही पोहोचले नसेल"."
महिला उद्योजिका या आजच्या कॉर्पोरेट जगाचा अविभाज्य अंग बनल्या आहेत. फक्त त्यांना आई होण्याची कर्तव्ये आणि उद्योगाप्रती असणाऱ्या जबाबदाऱ्या यांचाच समतोल साधतात असे नाही तर , एकूण बिझनेसपैकी निम्मा वाटा हा त्यांचा असतो. आज , आणखी महिला ह्या पारंपारिक, लैंगिक निश्चित भूमिकेला तोडून स्वतंत्र होत आहेत आणि उद्योगजगतामध्ये धडपड करीत आहेत. गेल्या दशकामध्ये महिला उद्योजकांची संख्या आणि यशस्वी होण्याच्या प्रमाणामध्ये नाट्यमयरीत्या मोठ्या प्रमाणावर वाढ दिसून आली. दहा वर्षांपूर्वी उद्योजक परिसंस्थेमध्ये अल्पसंख्यांक असण्यापासून, आज जगातील एकूण उद्योजकांपैकी 37% महिला आहेत. अलीकडील जागतिक उद्योजकता मॉनिटर (जीईएम) मध्ये 126 दशलक्ष महिला व्यवसाय सुरू करताना किंवा चालवताना आणि 98 दशलक्ष स्थापित व्यवसाय संचालित (साडेतीन वर्षांहून अधिक) करताना आढळल्या. 224 दशलक्ष महिला या जागतिक अर्थकारणावर प्रभाव टाकीत असतात. आणि हे सर्वेक्षण वर्ल्ड बँकेने मान्य केलेल्या 188 देशांपैकी फक्त 67 देशांबद्दल आहे.
महिला उद्योजकांच्या उद्योग करण्यामागचा हेतू हा त्यांना आपल्या कामाप्रती असणारी प्रचंड उत्कटता असणे हा असतो. दुसरे प्रेरणादायी मूल्य म्हणजे महिला उद्योजकांमध्ये नियंत्रण करण्याची इच्छाशक्ती असते. बऱ्याच यशस्वी महिला या उद्योगांच्या मालक होऊ शकल्या कारण त्यांना स्वतःच स्वतःचे मालक होण्याच्या आणि त्यांची स्वतःची कंपनी चालवण्याच्या संधीमुळे प्रोत्साहन मिळाले. हीच संधी जर त्या दुसऱ्यांकडे काम करीत असत्या तर मिळालीच नसती. त्यांचे प्राथमिक ध्येय हे फक्त आर्थिक मिळकत नसून वैयक्तिक समाधान आणि सामाजिक सहभाग आहे. दुसरा प्रोत्साहन देणारा भाग म्हणजे कितीतरी यशस्वी महिला उद्योजिकांचा सहभाग हे एक मूलभूत तत्व आहे ज्यामुळे त्यांच्यामध्ये बहुविध कार्य करण्याची क्षमता असते आणि कौटुंबिक जीवन आणि व्यवसाय ह्यामध्ये समतोल साधण्याची वृत्ती त्याचबरोबर ध्येयासक्त धोरण असते.
प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला या आपल्या पुरुष सहकाऱ्यांपेक्षा जास्त पुढे जात आहेत. ज्यावेळी शिक्षणाचा मुद्दा समोर येतो, तेव्हा उच्च शिक्षणाची पदवी हा यशस्वी महिला उद्योजकांमध्ये आढळणारा समान धागा दिसून येतो. महिला उद्योजिकांचा कार्य प्रशिक्षण आणि शिक्षण ह्यावरील चांगल्या आरोग्य सुविधा देणारे पॅकेज पुरविण्याकडे कल असतो. विद्यार्थ्यांची शिक्षण शुल्क परत करणे आणि कर्मचारी शिक्षण सुरु ठेवणे आणि जास्त सुट्ट्या देणे , पगारी रजांचा पर्याय त्यांच्या कर्मचाऱ्यांना देणे यामुळे त्यांचा उद्योग समृद्ध होतो.
महिला उद्योजिका या स्वतःला गटांमध्ये किंवा मंडळांमध्ये एकत्रित येत आहेत. या ट्रेंडच्या मागील कारणे म्हणजे मजबूत उद्योग नेटवर्क स्थापन करण्याची महिलांची इच्छाशक्ती जिथे सदस्य हे सामुदायिक रीतीने संसाधने जमा करतात आणि एकत्रितपणे कौशल्य मिळवतात. सरकारी योजना आणि महिला उद्योजिकांच्या संस्था जसे फेडरेशन ऑफ वुमेन आंत्र्यप्रेन्युरशिप असोसिएसन ही उद्योजकांच्या जगात जाणारी पायरी म्हणून प्रोत्साहन देणारी साधने आणि संसाधने आहेत. हा योगायोग नाही कि ज्या राज्यांचा साक्षरता टक्का जास्त आहे तिथेच जास्त महिला उद्योजिका आहेत. खरं तर, दक्षिणेकडील चार राज्यांमधील आणि महाराष्ट्रातील महिला उद्योजक भारतातील 50% पेक्षा जास्त महिला-नेतृत्व असलेल्या सर्व लघु-औद्योगिक संस्थांमध्ये वाटेकरी आहेत.
जरी महिला उद्योजिका आणि महिला उद्योग नेटवर्क निर्माण होणे हे सातत्याने वाढत असले , तरी अनेक अश्या महिला उद्योजिका आहेत ज्यांनी आपल्या उद्योगाच्या कल्पनांवर कार्य सुरु केलेले नाही. बऱ्याच महिला उद्योजिका त्यांच्या स्टार्ट अपशी संबंधित असलेल्या कर्जाला घाबरतात. दुसरे आव्हान म्हणजे त्यांचे माहिती तंत्रज्ञान आणि उद्योजकीय कौशल्यांसंबंधीचे असणारे अज्ञान.
जरी महिला उद्योजिकांना भेडसावणाऱ्या समस्या असल्या तरी, नजीकच्या भविष्यामध्ये त्यांच्यासाठी अनेक चांगल्या संधी देखील आहेत. जरी अनेक यशस्वी उद्योग जोखमी त्याच्याशी संबंधित असले तरी , असे अनेक इतर समृद्ध उद्योगधंदे आहेत जे अस्तित्वात आहेत आणि वाढत आहेत. अनुभव हा नेहमीच एक फायदा असतो; तथापि, एखाद्याला त्यांच्या उद्योग, त्यांच्या ग्राहक आधार आणि स्पर्धकांवर पुरेसा संशोधन करावा लागेल आणि या प्रक्रियेतून आधीच गेलेल्या उद्योजकांशी चर्चा करावी लागेल. अधिक म्हणजे, महिला सभासदांमध्ये असे अनेक संयुक्त उद्योग निर्माण होतील. ज्यामुळे महिला उद्योग नेटवर्क्सना उद्योग जगतामध्ये समृद्ध होण्यासाठी मदत होईल.
उद्योजकता ही अनुभवातून शिकण्याची गोष्ट आहे आणि अगदी सर्वोच्च यशस्वी उद्योगांच्या मालकांना सुद्धा त्यांच्या कंपनीचा विकास होत असताना नवीन गोष्टी शिकाव्या लागलेल्या आहेत. उद्योजकीय उपक्रमांमुळे विकास, समृद्धी आणि सामाजिक समस्यांवर उत्तर शोधता येते. सध्याचा कल असा दिसून येत आहे कि महिला या भविष्यातील उद्योजकता विकासामागील ड्रायव्हिंग फोर्स आहे.